Life of Stories

# 2074 : कुंती. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 11:44

Send us Fan Mail

मथुरेवर राज्य करणाऱ्या वृष्णी यदुवंशीय देवमीढ शूरसेनाची ज्येष्ठ कन्या, म्हणजेच विस्तीर्ण नयनांनीची आणि अत्यंत रूपवती असलेली पृथा, हिचे बालपण काहीसे वेगळेच होते. तिचा जन्म होण्यापूर्वीच तिच्या वडिलांनी तिला दुसऱ्याच्या स्वाधीन केले होते. त्यांनी तिला आपला जवळचा मित्र आणि अपत्यहीन चुलतभाऊ असलेल्या कुंती राज्याच्या भोज यदुवंशीय कुंतीभोजाला भेट म्हणून दिले होते. पृथाचा जन्म झाल्यानंतर लगेचच कुंतीभोजने तिला दत्तक घेतले आणि तेव्हापासून ती 'कुंती' या नावाने ओळखली जाऊ लागली.