Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Episodes
2125 episodes
# 2127 : मृतदेहांची टंचाई अन् सोळा निर्घृण हत्या. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानवी शरीररचनेचा (Anatomy) अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. शरीरातील हाडे, स्नायू, रक्तवाहिन्या, नसा, अवयव आणि त्यांची रचना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मानवी शरीराचा अ...
# 2126 : श्रावणातील वरदलक्ष्मी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे हे आपल्याला माहित आहेच. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध-बृहस्पती पूजन झाल्यावर येतो तो श्रावणी शुक्रवार. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीचे म्हणजेच जरा-जिवंतिका पूजन केले जाते. श्रावणी श...
# 2125 : मानो, या ना मानो... ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
पंडितजी भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत. त्यांचेकडे एक फोटो आहे श्रीकृष्णाचा. त्यातील भाव त्यांना जिवंत वाटत असे.एकदा त्यांनी का त्यांच्या मुलाने नवे घर घेतले होते. तिथे जाण्यासाठी गडबड चालली होती. पण त्या गडबडीत तो फोटो क...
# 2124 : माणुसकी अजूनही जीवंत आहे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
मी चालत असताना माझ्या वाटेत एका विजेच्या खांबावर एक छोटासा कागदाचा तुकडा झुलत होता. त्यावर काय लिहिलंय याची उत्सुकता मला झाली आणि मी जाऊन वाचलं.त्यावर लिहिलं होतं:"माझं ५० रुपये हरवलं आहे. कुणाला मिळालं असेल तर कृपया या पत्त्यावर परत द्...
# 2122 : " कृष्णजन्म " (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
कृष्णाच्या जन्माच्या रात्री मथुरेत मुसळधार पाऊस कोसळत होता. तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले आणि वसुदेव कृष्णाला टोपलीत घेऊन यमुनेकडे निघाले. दुथडी भरून वाहणारी यमुना कृष्णाच्या चरणांशी येऊन शांत झाली आणि शेषनागाने फण्यांचं ...
# 2121 : "ज्याने स्टॅलिनलाही नाही चकीत केले ." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
एक कोरा चेक… आणि त्याच्या बदल्यात चक्क एक लाख रुबल्स!समोर होता बँकेचा कॅशियर… आणि पैसे काढून दाखवण्याचं आव्हान होतं खुद्द स्टॅलिनचं!वुल्फ मेसिंगने हा विलक्षण प्रयोग खरंच यशस्वी केला होता का?तो जाग...
"देवा मला वर नको" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
त्या संताला लोक प्रतिपरमेश्वरच मानू लागले होते.त्यामुळे चिंतेत पडून परमेश्वराने ठरवलं की आता याला काहीतरी दैवी शक्ती दिलीच पाहिजे. “लोकांना माणुसकीची ताकद कळली, तर माझ्या दैवी शक्तीचं काय?”फकिराने कधी तशी कामनाह...
# 2119 : सहवासाची भूक. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
"आई... तुम्ही जेवलात ना?" वैशालीने सहजच विचारलं.समोर बसलेल्या सुमित्रा काकूंनी हलकंसं हसत उत्तर दिलं, "हो गं सूनबाई... पोटभर जेवले."पण वैशाली स्वयंपाकघरात गेली, तर सिंकमध्ये ठेवलेल्या स्टीलच्या ताटाकडे तिचं लक्ष गेलं. ताटात अर्धी कोरडी ...
# 2118 : सासुबाईंची अट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
"सूनबाई... या घराच्या चाव्या तुला तेव्हाच देईन, जेव्हा तू माझी एक अट मान्य करशील."नववधू स्वराने आश्चर्याने आपल्या सासूबाई सुमनताई यांच्याकडे पाहिले.तिच्या मनात विचार आला, "कदाचित सासूबाई घराचे नियम सांगतील... पहाटे लवकर उठायचं, डोक्यावर...
# 2117 : एका गाण्याची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
जयश्रीबाईंनी सुरेश भटांना विचारले..., त्यांची माफी मागितली.., सुरेशभाऊ नुसतेच हसले..., गाडी सुटणार तेव्हढ्यात सुरेश भाऊंनी एक कागद जयश्री ताईंच्या हातात ठेवला..!"हे घ्या आपले गाणे..! आपली व्यावहारिक अडचण मला समजते जयश्रीताई.., पण त्याचे...
# 2116 : तुमचा आशीर्वाद हिच भेट! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
हळूहळू खात्री पटायला लागते की लोकांनी पत्रिकेतील सूचना गंभीरपणे घेतली आहे. आपणही पाकीट खिशातून काढत नाही. उलट मनात यजमानांचं कौतुक सुरू होतं. किती छान विचार आहे. शेवटी लग्न म्हणजे माणसांनी एकत्र येणं. पैशाचा व्यवहार कशाला? माझ्यातला समाजसुधारक ...
# 2115 : आपण चुकीच्या वाटेवर चालू नये म्हणून.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
सारंग आधीच प्रचंड मानसिक तणावात होता. त्याचा पुण्यातला कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय बुडण्याच्या मार्गावर होता. आज सोलापूरमध्ये दुपारी दोन वाजता त्याची एका सरकारी अधिकाऱ्यासोबत अत्यंत महत्त्वाची मिटिंग होती. एक मोठा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी तो तब्बल पन्...
# 2114 : पण त्यांचे अनुभव अमूल्य असतात. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
आधी जेवणाच्या टेबलावर महेंद्रजी एखादा मजेशीर किस्सा सांगत असत. आता, सर्वजण शांतपणे जेवण आटपून आपापल्या खोलीत निघून जात.सर्वात मोठा बदल आरुषमध्ये झाला होता.त्याने आजोबांच्या खोलीत जाणे जवळपास बंद केले होते. त्याला वाटायचे की आजोबा आता त्...
# 2113 : निवृत्ती म्हणजे शेवट नाही. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
रिटायर झाल्यानंतर त्यांना वाटलं, आता आपली कोणालाच गरज नाही.. पण सुनेने असा एक निर्णय घेतला की त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली. निवृत्ती म्हणजे शेवट नाही… स्वतःला पुन्हा शोधण्याची वेळ असते ही...
# 2112 : अडीच मिनीटात संपवला अपहरणाचा थरार. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
कॅप्टन उरी बार-लेव्ह ॲमस्टरडॅमहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एल -अलच्या प्रवासी विमानाचे उड्डाणाची तयारी करत होते. या फ्लाईट्ची (El Al Flight 219 ) सुरुवात तेल अवीवहून झाली होती आणि ॲमस्टरडॅम हा त्यातील दुसरा टप्पा होता.उड्डाणापूर्वी शिफोल विमानत...
# 2111 : त्सुतोमु यामागुची. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
त्या दिवशी जेव्हा ते तिथून निघण्याच्या तयारीत होते, तेव्हा हिरोशिमावरील आकाशाचे स्वरूप अचानक बदलले. यामागुची यांनी वर पाहिले असता, त्यांना अमेरिकेचे B-29 हे बॉम्बर विमान आकाशातून उडताना दिसले. त्यातून पॅराशूटला जोडलेली एक छोटी वस्तू खाली ...
# 2109 : जिथे सर्वच ‘होयबा‘ असतात. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
रशियाचा हुकूमशहा आपल्या खोलीत बेशुद्ध पडला होता… पण बाहेर उभ्या असलेल्या कुणाचीही आत जाण्याची हिंमत होत नव्हती. ज्याच्या एका शब्दाने माणसं तुरुंगात जायची, त्याच्यासाठी डॉक्टरांना बोलवायचं की नाही, हे ठरवायलाही सगळे घाबरत होते. ...
# 2110 : "438 दिवस समुद्रात...!" ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
जगातला सर्वात मोठा महासागर म्हणजे प्रशांत महासागर. याच महासागरात, मेक्सिकोच्या किनाऱ्यावर मासेमारी करणारा होता जोसे साल्वाडोर अल्वारेंगा. त्याच्याकडे होती फक्त सात मीटर लांबीची एक छोटीशी नाव.एका दिवशी मासेमारीला गेले...
# 2108 : "जीवन का जगावं?" पु.ल. देशपांडे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
प्रिय चंदू.जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं. मग कुठल्याही क्षेत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे तर तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. My dear boy, whose deat...
# 2107 : प्रेमाला प्रतिसाद हवा असतो . (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
"परतफेडीची संधीच न ठेवता केलेली मदत हे उपकार होतात. ते कोणालाही आवडत नाहीत". "तुम्ही त्यांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून परतफेडीची संधी दिलीत. बरोबरीला आणलंत." "प्रेम फक्त बरोबरीच्या नात्यातच जन्मू शकतं! माणसाला असं वाटाय...
# 2106 : "अत् दीप भव." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
ही कथा फक्त कंदिलाची नाही.आपण अनेकदा दुसऱ्यांच्या ज्ञानावर, दुसऱ्यांच्या अनुभवावर, दुसऱ्यांच्या विचारांवर किंवा दुसऱ्यांच्या मतांवर जगत असतो. पण तो उजेड कायमचा नसतो. एखाद्या क्षणी तो विझतो... आणि मग आपल्यालाच अंधारात चाचपडावं लागतं.<...
# 2105 : हिटलरचा मृत्यू. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात हिटलर जमिनीच्या ५० फुट खाली बनलेल्या बंकरमध्ये राहात होता. फक्त आपली लाडकी कुत्री ब्लाँडीला फिरवायला कधीकधी चॅन्सलरी बागेत जायचा तेव्हा चारी बाजूला बाँम्बमुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे अवशेष पडले...
# 2104 : कथा नागपंचमीची. : श्रद्धेत दडलंय विज्ञान (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं.श्रावणमास आला. नागपंचमीचा दिवस उजाडला. वारुळात जी नागाची नागकुळं होती, त्यांना नांगराचा फाळ लागला........जशी नागीण शेतकरी कुटुंबावर प्रसन्न झाली, तशी तुम्ह...
# 2103 : घन घन माला नभी दाटल्या" लेखक : सुमित्र माडगूळकर. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
"ज्ञानियाचा वा तुक्याचा, तोच माझा वंश आहे,माझिया रक्तात थोडा, ईश्वराचा अंश आहे…”असं आपल्या कवितेतून सांगणारे कवी, गीतकार आणि साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून अनेक अजरामर गाणी जन्माला आली. त्यापैकीच एक गीत&...