Life of Stories

# 2115 : आपण चुकीच्या वाटेवर चालू नये म्हणून.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

डॅा. सौ. आरती जुवेकर.

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 7:48

Send us Fan Mail

सारंग आधीच प्रचंड मानसिक तणावात होता. त्याचा पुण्यातला कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय बुडण्याच्या मार्गावर होता. आज सोलापूरमध्ये दुपारी दोन वाजता त्याची एका सरकारी अधिकाऱ्यासोबत अत्यंत महत्त्वाची मिटिंग होती. एक मोठा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी तो तब्बल पन्नास लाखांची लाच देणार होता. हे काम बेकायदेशीर होते, पण स्वतःची कंपनी वाचवण्यासाठी त्याने हा चुकीचा मार्ग निवडला होता. त्याच्या पत्नीने, 'गौरी'ने सकाळी आग्रह केला होता, "सोलापूरला जाताय तर वाटेत अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घेऊन जा." केवळ तिच्या समाधानासाठी, कसलीही श्रद्धा नसताना सारंग मंदिरात आला होता.