मैफल  Artwork

मैफल

मी, लेखिका ज्योती दाते, 'मैफल पॉडकास्ट' माध्यमातून एक छोटीशी भेट सर्व पुस्तक प्रेमींना देत आहे. 'दुनिया रंगबिरंगी' हे माझे प्रवासवर्णन पुस्तक माझ्याच आवाजात आता 'मैफल पॉडकास्ट' माध्यमातून ऐकायला उपलब्ध असेल. दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ पासून दर बुधवारी ह्या पुस्तकातील एक भाग सादर करण्यात येईल. स्वतःचे साहित्य जगभरातील मराठी वाचकांसाठी श्रवण माध्यमातून उपलब्ध करून द्यायचा माझा हा पहिलाच अनुभव. सुरवात माझ्याच वाढदिवसानिमित्त होत आहे आणि अजून खूप मोठा साहित्यिक प्रवास ह्या 'मैफल पॉडकास्ट' माध्यमातून तुमच्या सर्वांसोबत करायचा मनसुबा आहे. ह्या महत्वाकांक्षी उपक्रमात आपण एकत्र वाटचाल करू शकणार आहोत. सुरुवात अर्थातच 'दुनिया रंगबिरंगी' ह्या प्रवासवर्णन पुस्तकापासून करत आहे. गेल्या २ वर्षात कोवीड मुळे सर्वचजण प्रवासाला घराबाहेर पडू शकलो नाही तेव्हा एक अनोखी सफर 'मैफल पॉडकास्ट' माध्यमातून तुम्हा सर्वांना घडवायचा आणि तुमच्या जीवनात आनंद निर्माण करायचा माझा हा छोटासा प्रयत्न.


सदर पॉडकास्ट मधील मते व अनुभव हे व्यक्तिगत आहेत. हा पॉडकास्ट ऐकताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा अयोग्य माहिती देण्याचा लेखिकेचा अथवा ह्या पॉडकास्टच्या हक्कधारकांचा हेतू नाही ह्याची कृपया सर्व श्रोत्यांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. मैफल पॉडकास्टबद्दलची आपली मते व सूचनांचे स्वागत आहे, कृपया datemaifal@gmail.com ह्या ई-मेल वर ती जरूर पाठवावी ही विनंती. धन्यवाद.


संकल्पना, रचना व तांत्रिक संयोजन:आशा आणी मिलिंद अग्निहोत्री


पॉडकास्ट निर्मात्या आणि सूत्रधार: श्रीमती ज्योती दाते


(C) ज्योती दाते, २०२२.

मैफल

Latest Episodes