मैफल

गुलदस्ता: रेकॉर्डसचे रेकॉर्ड ब्रेक, सुपर कॅस्सेट्सचे साम्राज्य

Season 6 Episode 5

मैफल पॉडकास्ट पर्व - ६ 'गुलदस्ता' मध्ये श्रीमती ज्योती दाते यांनी आयुष्यातील काही खुमासदार प्रसंग विनोदाची झालर देत शब्दबद्ध केले आहेत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अश्या घटना घडत असतात की त्या म्हटल्या तर मनोमन अनेक मिश्र रसभाव उत्पन्न करतात. पण ज्योती दाते ह्यांनी ज्या हातोटीने ह्या प्रसंगांना हाताळले आणि लेखन शैलीतून सादर केले त्यामुळे तर अगदी आयुष्याच्या चवदार लज्जतीची अनुभूती हे किस्से ऐकताना मिळते. सदर लिखाण अंदाजे तीस वर्षांपूर्वी केले आहे. पण सर्वच आजच्या काळाशी अगदी मिळते जुळते आहे. पुन्हा पॉडकास्ट माध्यमातून ऐकताना तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करते. सादर करत आहे 'गुलदस्ता.'

सदर पॉडकास्ट मधील मते व अनुभव हे व्यक्तिगत आहेत. हा पॉडकास्ट ऐकताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा अयोग्य माहिती देण्याचा लेखिकेचा अथवा ह्या पॉडकास्टच्या हक्कधारकांचा हेतू नाही ह्याची कृपया सर्व श्रोत्यांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. आपल्याला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे datemaifal@gmail.com  ह्या इमेलवर जरूर कळवावे. धन्यवाद. 

संकल्पना, रचना व तांत्रिक संयोजन: आशा आणी मिलिंद अग्निहोत्री

पॉडकास्ट निर्मात्या आणि सूत्रधार: श्रीमती ज्योती दाते

(C) ज्योती दाते, २०२२